अशास्त्रीय सल्ले ,विनोद आवरा ,सरकारी यंत्रणेला सहकार्य करा*  ......................................... : *राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेल चे कोरोना पासून बचावाचे आवाहन* 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


प्रेस नोट 


*अशास्त्रीय सल्ले ,विनोद आवरा ,सरकारी यंत्रणेला सहकार्य करा* 
.........................................
: *राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेल चे कोरोना पासून बचावाचे आवाहन*


पुणे:


कोरोना हे जागतिक संकट असून कोरोना पासून बचाव करण्याचे अनेक अशास्त्रीय उपाय सोशल मिडीयावरून व्हायरल होत असून,हे अशास्त्रीय उपाय आणि गांभीर्य कमी करणारे विनोद यांना आवर घालून शासकीय यंत्रणेला सहकार्य करण्याचे आवाहन पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेल तर्फे करण्यात आले आहे. 


   पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेल चे अध्यक्ष डॉ. सुनील जगताप यांनी याबाबत रविवारी सकाळी पत्रक काढून नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे .  


' शासकीय यंत्रणेने आणि वैद्यकीय तज्ञांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. भय निर्माण होईल असे संदेश पसरवू नयेत. कोरोना ला अटकाव करायला मास्क उपलब्ध झाले नाहीत ,तर दुहेरी पद्धतीने रुमाल/स्कार्फ  तोंडावर बांधावा ,सॅनिटीझर  उपलब्ध न झाल्यास साबणाने हात धुवावेत. परदेशी नागरिक किंवा परदेशातून आलेले नागरिक आपल्या इमारतीत असतील तर किमान १५ दिवस त्यांचा संपर्क टाळावा,प्रवास-समारंभ  टाळावा ,प्राथमिक बाबतीत फॅमिली फिजिशियन च्या संपर्कात राहावे ,डॉक्टरांनी सुद्धा रुग्णांना तपासताना शास्त्रीय काळजी घ्यावी अशा सूचनाही डॉक्टर सेलने केल्या आहेत. 


दरम्यान ,डॉ सुनील जगताप यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर सेलची बैठक टिळक रस्ता कार्यालयात झाली त्यात शासकीय यंत्रणेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला डाॅ हेमंत तुसे, डाॅ सिध्दार्थ जाधव, डाॅ अजितसिंह पाटील, डाॅ शशिकांत कदम, डाॅ परशुराम सूर्यवंशी, डाॅ प्रताप ठुबे, डाॅ नितिन पाटील, डाॅ मुश्ताक तांबोळी, डाॅ राजेश पवार,राहूल सुर्यवंशी, डाॅ राजश्री पोखरणा यावेळी उपस्थित होते .


................................................