इंदोर येथे मराठी राजभाषा दिन विविध कार्यक्रमांनी साजरा.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


 


इंदूर मध्यप्रदेश येथे मराठी राजभाषा दिनाचे औचत्य साधून २९ फेब्रुवारी या दिवशी मध्यप्रदेश सरकार व लिवा साहित्य समिति यांनी काव्यसंवाद या कार्यक्रमाचे अत्यंत सुंदर नियोजन केले होते.हिन्दी तसेच मराठी जेष्ठ साहित्यिक मा.विश्वनाथ शिरदोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील पुणे येथील अग्रगण्य साहित्यिक संस्था महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे या संस्थेचे महाकवी कालिदास पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कविवरांचे तसेच मध्यप्रदेशातील ज्येष्ठ अशा ३० कवीवरांचे कवी संमेलन,चर्चासत्र संपन्न झाले.प्रमुख पाहुणे पुणे येथील ज्येष्ठ साहित्यिक वि.ग.सातपुते(भावकवी,मुद्रक,प्रकाशक) होते.या कार्यक्रम प्रसंगी मध्यप्रदेश सरकारच्या मराठी साहित्य अकादमीच्या पूर्णिमा हुंडीवाले,डॉ.ठाकुरदास,मिलिंद जोशी,मीराताई शिंदे,जयंत देशपांडे,मंदाताई नाईक,नीलिमा पंढरे आदि मान्यवरांच्या बरोबरच साहित्यिक व कवी उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना वि.ग.सातपुते यांनी मराठी ही आपली माय माऊली आहे.तिची अस्मिता आपण सर्व मराठी बांधवांनी जपली पाहिजे असे प्रतिपादन केले. 


छायाचित्र :वि.ग सातपुते व  पूर्णिमा हुंडीवाले


==+++++=+===+++=+×=++==+===+