*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
*मा. उप मुख्यमंत्री कार्यालय,*
*मंत्रालय, मुंबई.*
दि. 9 मार्च 2020.
*ज्येष्ठ पत्रकार अनंत दिक्षीत यांच्या निधनानं व्यासंगी व्यक्तिमत्वं पडद्याआड*
_*उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली*_
मुंबई, दि. 9 :- ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक अनंत दिक्षीत यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले असून पत्रकारितेच्या क्षेत्रातील व्यासंगी, ध्येयनिष्ठ व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे, अशा शब्दात त्यांनी अनंत दिक्षीत यांना श्रद्धांजली वाहिली.
उपमुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, अनंत दिक्षीत हे विचारांनी परखड व अनेक पत्रकारांचे आदर्श होते. पत्रकारांच्या अनेक पिढ्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाल्या. कोल्हापूर आणि पुण्याशी त्याचं जिव्हाळ्याचं नातं होतं. त्यांच्या संस्कारातून घडलेले पत्रकार यापुढच्या काळात त्यांचे विचार पुढे नेतील, असा मला विश्वास आहे.
*****
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*
*संपादक संतोष सागवेकर,*
*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*
*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*