खेड आळंदीचे आमदार दिलीप मोहिते यांनी न्यायालयाची दिशाभूल करून मिळविलेला जामीन रद्द करण्याची मागणी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कृपया प्रसिद्धीसाठी


*खेड आळंदीचे आमदार दिलीप मोहिते यांनी न्यायालयाची दिशाभूल करून मिळविलेला जामीन रद्द करण्याची मागणी*


*समाजसेवक राहुल किसन कांडगे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने दिलीप मोहितेंना दिली नोटिस*



मुंबई दि.17 - खेड आळंदी चे आमदार दिलीप मोहिते यांच्यावर जुलै 2018 मध्ये चाकण दंगली प्रकरणी मुख्य सूत्रधार म्हणून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. त्या गुन्ह्यात दिलीप मोहितेंना अटक पूर्व जामीन खेड न्यायालयाने नाकारला होता. त्यामुळे दिलीप मोहिते यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटक पूर्व जामिनासाठी अर्ज केला. त्या अर्जासोबत त्यांनी न्यायालयाची दिशाभूल करणारी कागदपत्रे आणि ज्या एफ आय आर मध्ये त्यांचे नाव नाही असा एफ आय आर सादर केला. त्यामुळे न्यायालयाने त्यांना अटक पूर्व जमीन मंजूर केला. या प्रकरणी समाजसेवक राहुल किसन कांडगे यांनी आमदार दिलीप मोहिते यांनी न्यायालयाची कशी फसवणूक केली हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्याबाबतची कागदपत्रे एफ आय आर कॉपी आदी सादर करून न्यायालयात अर्ज दाखल केला. त्या अर्जाची न्यायालयाने दखल घेतली असून न्यायालयाची फसवणूक करण्याचे  प्रकरण गंभीर असून याबाबत न्यायालयाने आ. दिलीप मोहिते आणि संबंधितांना तीन आठवडयात उत्तर देण्याची नोटीस बजावली आहे. अशी माहिती समाजसेवक राहुल किसन कांडगे यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. विशेष बाब म्हणजे विधानसभा उमेदवारी अर्ज भरताना चाकण दंगल प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याची कलम 120 ब सहित त्यांचे नाव असलेल्या एफ आय आरची माहिती दिलीप मोहिते यांनी दिली आहे. ते प्रतिज्ञापत्र ही समाजसेवक राहुल कांडगे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे. निवडणूक आयोगाकडे दिलेली गुन्ह्याची माहिती आणि न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी सादर केलेला एफ आय आर यात तफावत असल्याचे अर्जदार राहूल किसन कांडगे यांनी न्यायालयाचे निर्दशनास आणून दिले आहे.
चाकणमध्ये मराठा आरक्षणसाठी जुलै 2018 मध्ये झालेल्या हिंसक आंदोलनात 100 ते 125 तरुण मराठा मुलांवर कलम 102 ब सह अनेक गुन्हे दाखल होवून त्यांना अटक करण्यात आली होती. त्या मुलांना येरवडा जेलमध्ये 20 दिवस जेलमध्ये डांबण्यात आले होते. त्या मराठा मुलांचे आयुष्य उध्वस्त झाले. त्या आंदोलन हिंसक करण्याचे मुख्य सु़त्रधार दिलीप मोहिते होते. त्यांच्यावर चाकण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा रजि. नं. 695/2018 भा.दं.वि. कलम 307, 326, 333, 332, 324, 435, 436, 353, 323, 341, 427, 143, 144, 145, 148, 149, 120 ब या सह राष्ट्ीय महामार्ग अॅक्ट कलम 8 ब, नॅशनल ग्रीन ट्ब्यिुनल अॅक्ट 26, सार्वजनिक संपत्तीस आणि प्रतिबंध अधिनियम 1984 चे कलम 4 व 5, क्रिमिनल लाॅ अमेंडमेंट अॅक्ट कलम 7 याप्रमाणे गुन्हे दाखल आहेत. या गुन्हे नुसार खेड न्यायालयाने दिलीप मोहिते यांना अटक पूर्व जामीन नाकारला. मात्र मुंबई उच्च न्यायालयात अटक पूर्व जामिन कसा मिळाला याची समाजसेवक राहूल किसन कांडगे यांनी माहिती घेतली असता या गुन्हयांचा व ज्या एफ आय आर मध्ये दिलीप मोहिते यांचे नाव नाही असा एफ आय आर उच्च न्यायालयात सादर करण्यात करुन कोर्टाची दिशाभूल करण्यात आली. त्यामुळे दिलीप मोहिते यांचा अटक पूर्व जामिन रद्द करण्याची मागणी करित समाजसेवक राहूल किसन कांडगे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायालयाने आ. दिलीप मोहिते यांना उत्तर देयासाठी तीन आठवडयाची मुदत दिली आहे. मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन हिंसक करुन तरुणांचे आयुष्य उध्वस्त केल्यामुळे आ. दिलीप मोहिते यांच्या निषेधार चाकण नगरपरिषदेचा स्विकृत नगरसेवक पदाचा समाजसेवक राहूल किसन कांडगे यांनी राजीनामा दिला आहे. आ. दिलीप मोहिते यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचे व यापूर्वी त्यांच्या गुन्डांमार्फत हाल्ला झाल्याचा आरोप राहुल किसन कांडगे यांनी आ. दिलीप मोहितेवर केला आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की जुलै 2018 मध्ये चाकण मध्ये मराठा आरक्षण प्रकरणी आंदोलनाला हिंसक स्वरूप देऊन दंगल स्वरूप देण्यात आले. याबाबत पोलिसांनी तपास करून चाकण मध्ये हिंसक आंदोलन घडविल्या प्रकरणी मुख्य सूत्रधार म्हणून त्यावेळी माजी आमदार असणारे दिलीप मोहिते यांच्यावर गुन्हा नोंदविला. त्यांच्या विरुद्ध या प्रकरणात दोन एफ आय आर नोंदविण्यात आले होते. त्यात एका एफ आय आर मध्ये दिलीप मोहिते यांचे नाव नाही आणि एका एफ आय आर मध्ये मुख्य सूत्रधार म्हणून दिलीप मोहिते यांचे नाव आहे. त्यानुसार चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यावर खेड न्यायालयात अटक पूर्व जमीन साठी दिलीप मोहिते यांनी अर्ज केला होता. या प्रकरणी खेड न्यायालयाने त्यांना  अटक पूर्व जामीन नाकारला. त्यांनंतर दिलीप मोहिते यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज करून अटक पूर्व जामीन मिळविला. या साठी त्यांनी कोर्टाची दिशाभूल करणारी कागदपत्रे आणि एफ आय आर सादर केला आहे. कोर्टाची त्यांनी फसवणूक केल्याचा आरोप समाजसेवक राहुल कांडगे यांनी केला असून या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने आमदार दिलीप मोहिते यांना नोटीस बजावली आहे.


               आपला विश्वासू 
            राहुल किसन कांडगे