पुणे प्रवाह न्युज पोर्टल
चांगल्या कामाची नागरिक दखल घेतातच पण योग्य शब्दात व कृतीतून कामाची पोच देखील देतात - *आज असेच कर्तव्यपूर्तीचे समाधान लाभले* ते *पतंजली योग समितीने* नवनिर्मित केंद्रात *यज्ञ* करुन योग वर्गाच्या महिन्याच्या पूर्ततेचा क्षण साजरा केला.
*मी सर्वांची ऋणी आहे* 🙏
*सौ.मंजुश्री संदीप खर्डेकर*
🕉🕉🕉🕉🕉
कोथरूड येथील करिष्मा सोसायटीच्या जवळच असलेल्या ठिकाणी प्रभागाच्या नगरसेविका आदरणीय सौ . मंजुश्रीताई संदीप खर्डेकर यांनी या परिसरातील नागरिकांसाठी, योग साधकांसाठी पुणे मनपाच्या सहकार्याने भव्यदिव्य बिल्डिंग उभी करून, सदर वास्तूमध्ये अंतर्नाद योग केंद्र व निसर्गायन बाल वाचनालय केंद्र प्रस्थापित केले. सदर योग केंद्र मध्ये पतंजली योग समिती पुणे यांचे सहकार्याने मोफत चार योग वर्ग गेली महिनाभर नियमित चालू आहेत. परिसरातील नागरिक मोठ्या उत्साहाने, सहभाग घेऊन चांगली जीवनशैली जगण्याचा आनंद घेत आहेत.🙏🏻🙏🏻🥦🥦 नागरिकांना अशा उत्तम प्रकारे अनेक चांगल्या सवयी लागाव्यात, बाल संस्कार वर्ग, वाचनालय, नैसर्गिक जीवन पद्धती, अध्यात्मिक संस्कार, ध्यान वर्ग अशा अनेक प्रकारे ज्ञान देणारे वर्ग या योग केंद्रांमध्ये सुरू आहेत.या विभागाच्या नगरसेविका सौ. खर्डेकर ताई यांनी आज प.यो.स.चे राज्य प्रभारी आदरणीय श्री बापुजी पाडळकर यांचे उपस्थितीत प.यो.स.पुणेचे योगाचार्य श्री गोविन्द जी गाडगीळ व पदाधिकारी यांचेकडे होम हवन करून, खऱ्या अर्थाने जबाबदारी पतंजली समितीकडे सुपूर्त केली.व जीवनात चांगला उपक्रम राबविल्याचे समाधान न.से. सौ. खर्डेकर ताईंनी व्यक्त केले.🙏🏻🥦 राज्य प्रभारी आ. श्री बापूंनी यज्ञ आणि यज्ञाच्या सामुग्रीची माहिती उपस्थितांना दिली.🙏🏻🥦 श्री गाडगिल सरांनी सहज समजेल अशा सुलभ भाषेत होम हवन सर्व उपस्थितांकडून करून घेतले.🙏🏻🥦 सदर कार्यास उपस्थित श्री ओमकारजी, भेलके जी, क्षिरसागर जी, नवले जी, सुषमाताई, दीपिका ताई वर्गशिक्षक राऊत सर, तर्कसबंदताई, मोहोळ ताई व साधक, यांनी जोमाने कार्यसिद्धी करण्याची ग्वाही दिली.व सर्वांनी समाधान व्यक्त केले.🙏🏻🙏🏻🥦🥦यशवंत भेलके.🥦🥦🙏🏻🙏🏻