पर्वती  येथे ९ फेब्रुवारी  रोजी  बुद्ध लेणी संवर्धन कार्यशाळा*

★★★पुणे प्रवाह न्युज पोर्टल★★★★


 


 


Press note


*पर्वती  येथे ९ फेब्रुवारी  रोजी  बुद्ध लेणी संवर्धन कार्यशाळा*


पुणे:
एन्शंन्ट बुध्दीस्ट केव्हज् रिसर्च अॅण्ड प्रिझर्वेशन ' संस्थेतर्फे 
बुध्द लेण्यांच्या अभ्यासासाठी , इतिहासाला उजाळा देण्यासाठी ,पर्वती , पुणे  येथे ९ फेब्रुवारी  रोजी  सकाळी १० वाजता बुद्ध लेणी संवर्धन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.


संस्थेच्या वतीने नागेश भारत भोसले, दीपक गायकवाड, मकरंद लंकेश्वर यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.


 
प्राचीन भारताचा  प्रदीर्घ प्रगल्भ इतिहास , बुध्दलेणीचे स्थापत्य, शिल्प, शिलालेख, धम्मलिपी या स्वरूपात बुध्द विचारांनी व्यापलेला आहे. दोन अडीच हजार वर्षांपासून बुध्द विचारांची शिकवण घेण्याची प्रेरणा लेण्यांमधून मिळते.  बुध्दांची समता, बंधुता आणि प्रेम समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचला पाहिजे. यासाठी बुध्द विचारांनी व्यापलेल्या बुध्दलेण्या संवर्धनासाठी सर्वांनी एकत्र येण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.


 पर्वती बुध्दलेणी हा पुणे जिल्ह्यातील ,पुणे शहरापासून जवळच असलेला प्राचीन बुध्द लेण्यांचा गट असून या गटात असणाऱ्या बुध्द प्रतिकांचा इतिहास पाहण्यासाठी आणि ही प्राचीन बुध्द प्रतिकांची सविस्तर माहिती घेण्यासाठी रविवारी दिनांक ०९ फेब्रुवारी २०२० रोजी  लेणीसंवर्धन कार्यशाळा आयोजित केलेली आहे. 


या लेणीसंवर्धन कार्यशाळेमध्ये परदेशी इतिहास अभ्यासकांचा सहभाग असणार आहे. या कृतिशील कार्यक्रमात आपण सर्वांनी उपस्थित राहुन हा प्राचीन वारसा जपण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन नागेश भारत भोसले केले आहे.


..