माले येथे गुरांचा गोठा आणि मोळ्या जळून खाक  शेतकऱ्याचे अतोनात नुकसान

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


माले येथे गुरांचा गोठा आणि मोळ्या जळून खाक 

शेतकऱ्याचे अतोनात नुकसान

कर्जत, दि. 29 गणेश पवार

                                  कर्जत तालुक्यातील साळोख तर्फे वरेडी ग्रामपंचायत मध्ये असलेल्या माले गावातील शेतकऱ्याच्या शेतावर असलेला गुरे बांधून ठेवण्याचा गोठा आणि साठवून ठेवलेला चारा हे अचानक लागलेल्या आगीमध्ये नष्ट झाले आहेत.अचानक लागलेल्या आगीमुळे माले या गावातील शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून जनावरांची पावसाळी सोय म्हणून साठवून ठेवलेले भाताच्या मोळ्या जळून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात देखील सापडला आहे.

                               कर्जत तालुक्यातील साळोख ग्रामपंचायत मध्ये माले हे गाव असून त्या गावातील हरीचंद्र जानू हिसालगे यांची शेती गावापासून लांब आहे.त्यामुळे त्यांनी आपल्या शेतीसाठी लागणारी अवजारे तसेच गुरे ठेवण्यासाठी गोठा बांधला आहे.

त्या गोठ्याच्या बाजूला मचाण बांधून ते भाताच्या सुक्या मोळ्या म्हणजे पेंढे साठवून ठेवत असतात.त्या सुक्या गवताच्या मोळ्या यांना 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या वेळी अचानक आग लागली.आग लागली त्यावेळी तेथे कोणीही नसल्याने आगीने तेथील जनावरे बांधण्याचा गोठा देखील पूर्णपणे जळून नष्ट झाला.त्या गोठ्यासोबत किमान 2000 पेंढ्याच्या मोळ्या जळून गेल्याने शेतकरी हरीचंद्र हिसालगे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.मात्र गोठ्यात नेहमी बांधून ठेवली जाणारी जनावरे ही चारा खायला मोकळी सोडलेली असल्याने त्यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही.

                             या नुकसानीबरोबर महत्त्वाचे म्हणजे भाताचा मोळ्या पासून बनलेला पेंढा हा आता सहज कुठेही मिळत नाही. हिसालगे यांनी पेंढा आपल्या गोठ्या तील जनावरे यांच्यासाठी पावसाळ्यात जनावरांना सुका चारा मिळावा म्हणून केलेली सोय होती.पण शेतकरी या अचानक लागलेल्या आगीमुळे पूर्णपणे हतबल झाला असून पेंढा जळून गेल्याने जनावरांना पावसाळ्यात काय चारा खायला द्यायचा?हा प्रश्न त्यांना भेडसावत असून दुसरीकडे त्यांच्याकडे असलेल्या जनावरांना आता कुठे बांधून ठेवायचे?हा प्रश्न समोर उभा ठाकला आहे.या संकटातून शेतकरी आता कसा सावरणार?असा प्रश्न असून त्या आगीबाबत स्थानिकांनी कर्जत चे तहसीलदार विक्रम देशमुख यांना माहिती देण्यात आली आहे.त्यांनी कळंब येथील मंडळ अधिकारी यांना सूचना दिल्या असून तात्काळ पंचनामा करायला पाठवले आहे.

 

 

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*