पिंपरी - (२०) – पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री. अजितदादा पवार यांनी पुणे महा मेट्रोचं नाव बदलून ‘पुणे-पिंपरी चिंचवड महामेट्रो’ असं करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्यात. पिंपरी स्वारगेट मेट्रो मार्ग वाढवून निगडी कात्रज असा करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आलाय. वनाज रामवाडी मार्ग वाढवून तो चांदणी चौक ते वाघोली असा होणार आहे. शिवाजीनगर हिंजवडी हा पीएमआरडीए करत असलेला मेट्रो चा मार्ग शिवाजीनगर माण असा वाढवण्यात येणार आहे या निर्णयाचे स्वागत शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी केले यावेळी ते म्हणाले यासाठी राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने आम्ही सर्व जणांनी अनेक वेळा मागणी केली होती. दादांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल दादांचे अभिनंदन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच पिंपरी चिंचवड शहराच्यावतीने या निर्णयाचे हार्दिक स्वागत करतो.
सदरची बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिध्द करावी ही विनंती.
कळावे,
आपला स्नेहांकीत,
संजोग वाघेरे-पाटील
शहराध्यक्ष