*स्त्रियांच्या उत्थानासाठी प्रयत्न करणारी जगातील पहिली महिला*
राजमाता माँसाहेब जिजाऊ....
धर्मशास्त्राने निषिध्द ठरविलेल्या व निर्वंश होण्याची दहशत पसरविलेल्या भूमिवर एकुलत्या एका मुलाला नांगरणी करायला लावणारी *जिजाऊ ही सांस्कृतिक व धार्मिक दहशतीतून रयतेला बाहेर काढणारी पहिली क्रांतिकारी स्त्री म्हणावी लागेल.*
जगातील महिलांनी एकमेव आदर्श म्हणून ज्यांचा स्वीकार करावा, असे राष्ट्रमाता जिजाऊंचे उत्तुंग व्यक्तीमत्व आहे. *सिंदखेडराजा येथे यादव कुळातील लखुजीराजे जाधव व म्हाळसाबाईच्या पोटी १२ जानेवारी १५९८ रोजी जिजाऊंचा जन्म झाला.* निजामशाहाच्या राजवटीत लखूजी जाधवाकडून बालपणापासूनच जिजाऊंना राजकारणाचे राजकारणाचे व देशप्रेमाचे धडे मिळालेत.
स्वाभिमानावर शिस्तीची देखरेख होती,
*अशी पराक्रमी ती जाधवांची लेक होती*
एकिकडे स्त्रियांचा अपमान करणार निजाम तर दुसरीकडे स्त्रियांचा सन्मान करणारे लखूजीराजे जाधव अशी ही पुरुषांची दोन भिन्न रुपे आजच्या २१ व्या शतकातही हमखास बघावयास मिळत असले तरी पुरुषप्रधान संस्कृतीत खऱ्या अर्थाने १२ व्या शतकापासून स्त्रियांच्या उत्थानासाठी प्रयत्न करणारी पहिली महिला म्हणजे माँसाहेब जिजाऊ होत. आज जो महाराष्ट्र उभा आहे त्याला जिजाऊंचे कार्य कारणीभूत आहे. कोणत्याही परिस्थितीत स्त्रिला सन्मान मिळावा हा मानवतावादी दृष्टिकोन माँसाहेबांचा होता.शिवरायांच्या स्त्रीविषयक दृष्टिकोनातही जिजाऊंच्या विचाराचीच धार होती. *शिवरायांनी जिजाऊंच्या संस्कारामुळे गुन्हेगाराला जीवनभर जगणं असाह्य केल.शिवरायांनी कोणतीही स्त्री असो तिचा आदरच केला. या विचारांचे बळ माँसाहेबांमुळेच शिवरायामध्ये दिसून येते.आईने मुलाला केवळ आईकडे म्हणून नव्हे तर समग्र स्त्री जातीकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून पहावयास शिकवावे.*
शहाजी राजेंच्या निधनानंतर जिजाऊ सती गेल्या नाहीत. *म्हणजेच ब्राह्मणी धर्माने स्त्रियांनसाठी जे कठोर नियम केले होते ते त्यांनी ठामपणे नाकारले यावरून त्या मजबूत निश्चयाच्या , ध्येयवादी व खंबीर स्त्री होत्या याची प्रचिती येते.*
राष्ट्रमाता या पदाचा खरा गौरव त्यांच्या अढळ ध्येयनिष्ठेत आहे. १७ व्या शतकात ही स्त्री स्वराज्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन अत्यंत समर्थपणे , एकटी झुंज देते. मुलाला घडविते हे सर्व जिजाऊंनी कृतीद्वारे दाखवून दिले आहे. संकट हा तर जिजाऊ आणि शिवबांच्या आयुष्याचा स्थायिभाव बनला होता. संकटांच्यावेळी शिवबाला एकमेव जिजाऊंचा आधार वाटत होता.
गोरगरिबांचे आश्रू पुसणे , अपंगांना, निराधारांना आधार देणे, मायाबहिणींची आब्रू लुटणाऱ्या उन्मत्त शक्तींना पार बुडवून टाकने या शिवरायांच्या सर्व कृतीमागे जिजाऊ होत्या. लोकसंघटन, बलोपासना, स्वराज्य, स्वधर्म याविषयी तळमळ हे सारे उदयास येऊन वाढीस लागले, हे सारेच घडून येऊ लागले तीच शिवराय महाराजांची नुतन सृष्टी ! या नुतन सृष्टीची जननी माँसाहेब जिजाऊ होत्या. माँसाहेबांनी इतिहासाला वेगळे वळन दिले. शिवबाच्या रुपात शिवशाही निर्माण करणारी माँसाहेब जिजाऊ स्वराज्याची स्फूर्ती, कारुण्याची मुर्ती आणि कृतीशीलतेची पूर्ती होत. या विश्ववंद्य, राष्ट्रमाता, लोकमातेला मानाचा मुजरा 👏👏👏
जय जिजाऊ🙏🙏जय शिवराय
🙏जय शंभुराजे🙏