*जिद्द - बळीराजाची 👑*
न्यू ब्रॅण्ड इनोव्हा, हिंजवडी, त्यात बसुन भाजी विकणे
तुम्ही म्हणाल हे नक्की आहे तरी काय...?
हो.. मान गावातील ह्या भरणे आजी रोज आपल्या मुलासोबत नव्या गाडीतून भाजी विकायला जातात. आजीचा दिवस सकाळी ठीक 5.30 वाजता चालू होतो. 6 वाजता आजी शेतात असतात आणि सगळा भाजीपाला काढून गाडीत भरून ही गाडी सकाळी 9 वाजेपर्यंत कधी सांगवी मध्ये तर कधी हिंजवडी आयटी पार्क तर कधी बाणेर पाषाण इथे असते. या सगळ्या कामात त्यांना त्यांचा मुलगा मदत करतो. त्यांना एकूण 15 एकर जमीन आहे. त्यामधे विविध प्रकारचा भाजीपाला (चायनीज भाजीपाला सुद्धा) कडधान्य, गहु बाजरी ज्वारी पिकवले जाते. आजींच्या गाडीत संक्रांती निमित्त सर्व भाजीपाला, बाजरी आणि लागणारे तिळ हे सुद्धा पॅकिंग करून ठेवले होते. आजी बाई दर दिवसाला दहा एक हजाराचा धंदा सहज करतात. कार मध्ये बसुन भाजी विकताना आजी बाईच्या तोंडावर एक वेगळीच लकीर असते. घरी जाताना मनात आल तर मस्त दोघे जण एखाद्या पॉश हॉटेल मध्ये जेवून रुबाबात घरी जातात. त्यांचा मुलगा तर म्हणाला यंदा कांद्याचे पैसे चांगले झाले आहे.. दिवाळीला फॉर्चुनर गाडी घेणार आहे. तीन चाकी गाडीवरून चालू झालेला प्रवास हा आज एका 15 लाखाच्या कार पर्यंत येऊन पोहोचला आहे. अशा या जिद्दी शेतकऱ्याकडे पाहून अभिमानाने ऊर भरून आला..
तरुणांना एवढच सांगू वाटत की कोणतच काम कमी जास्त दर्जाच नसते. थोडस बुद्धी चा वापर आणि कष्ट करायची ताकद असेल ना तर यश तुमच्या मांडीवर येऊन बसेल यात काही शंका नाही.....
*|| जय जवान जय किसान ||*
*#रॉयल_कारभार*
*#जिद्द*
*#farmers_life*
*#motivational*
*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*------
■★■★★■★◆★◆★◆★
*पुणे प्रवाह न्युज पोर्टल* ......
बातम्या - जाहिरात आणि अधिक माहितीसाठी
*संपादक संतोष सागवेकर*
*मोबाईल नंबर -९५८८६०३०५१*
*वर संपर्क साधावा*
*साप्ताहिक पुणे प्रवाह*
*Youtube _ Facebook* _
*Instagram Twitter*
*वर ही*
*आता पुणे प्रवाह*
..................
*वरील सर्व पेज लाईक* -
*सबस्काईब करून*,
*घंटी चे बटन ही दाबण्यास् विसरू नये,*
*विंनती*
~~~~
*पुणे प्रवाह परिवारांशी*
*आपले नातेसंबंध अधिक घट्ट करू या....*
★★★★
*सदैव राहा*
*पुणे प्रवाह परिवारांच्या*
*सोबत अपडेट*
👌👍✌🙏