छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात पाहिला पुतळा कोणी कुठे व केव्हा बसवला ?*

*छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात पाहिला पुतळा कोणी कुठे व केव्हा बसवला ?*
    
राजर्षी शाहू महाराजांनी इ .स. १९१७ मध्ये पुणे शहारातील भांबुर्डी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याबाबत शिवप्रेमीजनांची बैठक बोलावली होती. या विरोधात पुण्यातील ब्राह्मणांनी मोर्चा काढून त्या बैठकीवर दगडफेक केली. याशिवाय शाहू महाराज ज्या जागेवर थांबले होते तिथे रात्रीच्या वेळी लोकमान्य टिळकांच्या चिथावणी वरून काही ब्राह्मण तरूणांनी दगडफेक केली आग लावून देण्याचा प्रयत्न केला. 


पुणे शहरात शिवरायांचा पुतळा बसू नये हा ब्राह्मणांचा नारा होता. शाहू महाराजांना शिवाजीबद्दल एवढेच प्रेम असेल तर, तो पुतळा कोल्हापुरात बसवावा. असे ठराव ब्राह्मण सभेत पास झाले. पण भटांचा विरोध न जुमानता शाहुमहाराज स्मारक समितीचे अध्यक्ष झाले. कारण छत्रपती शिवरायांचा पुतळा हा जगातील पहिला पुतळा ठरणार होता. म्हणून भांबूर्डी येथील छत्रपती शिवाजी महाराज सैनिक शाळेच्या प्रांगणात हा पुतळा उभारण्याचे ठरवले. निधी जमू लागला. इ.स. १९२१ मध्ये शिवरांयाच्या पुतळ्याचे पुजन, चौथारा व भुमीपुजन झाले. पुतळ्यांचे नकाशे आराखडे चित्र तैयार करण्यात आले. 


त्यानुसार पुतळे बनावणारे कारागीर शोधले, पण सर्वच कारगीर ब्राह्मण असल्याने ब्राह्मण सभेने त्यांना दम भरला होता. त्यातही एक दोघांनी होकार दिला होता. पण त्यातच ६ मे१९२२ला शाहू महाराजांचे निधन झाले. मग ग्वाल्हेरचे जिवाजीराव शिंदे यांना समितीचे अध्यक्ष केले. त्यांनी काही कारागीर बोलवले त्यांना अॅडव्हॉन्सही दिला पण ते पळाले. शेवटी करमरकर नावाच्या एका मुर्तीकाराचा शोध लागला. त्याने सर्व काम करुन देण्याची हमी घेतली. पण पुण्यातील ब्राह्मणांनी त्याला खुप त्रास दिला तेव्हा तो पुणे सोडून मुंबईला गेला व जिवाजीराव महाराजांना भेटून त्यांने काम सुरू     केले. 


समितीने करमकरांना सर्व मदत केली. काम सुरू झाले पण एवढा मोठा पूतळा बनवण्यासाठी लागणाऱ्या भट्टया नव्हत्या म्हणुन समितीने इंग्रज सरकारकडे त्याबाबत मदत मागितली. तेव्हा मुंबईचे इंग्रज गव्हर्नरने त्यांचे नांव रिचार्डसन् क्रूडास यांनी फांऊड्रीमध्ये सर्व व्यवस्था करून दिली. सुमारे दोन वर्ष हे काम चालले व एकूण १२ तुकडयामध्ये हा पुतळा पूर्ण झाला. हे सर्व अवजड तुकडे मुंबई वरून पुण्याकडे घेवून जाण्याची सोय नव्हती. इंग्रजांची मुंबई पुणे रेल्वे सेवा सुरु झाली होती. इंग्रज शासनाने विशेष मालगाडीची व्यवस्था करुन पुतळा पुण्यास पोहचून देण्याची जबाबदारी ऊचलली. त्यावेळी पुण्यातील ब्राह्मणांनी त्या विरोधात  इंग्रजांना पत्र लिहले. 


शिवाजी महाराजाचा पुतळा पुण्यात बसवणे हा ब्राह्मणांचा अपमान आहे. सरकारने त्यास मदत करू नये. इंग्रजांनी ब्राह्मणांचे ऐकले नाही व इ. स .१९२७ मध्ये पुतळ्याचे सर्व भाग पुण्यात पोहचले. कडवट भटांनी मुंबई पुणे गाडीही तीन ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न केला होता. ते सर्व भाग जोडण्याचे साहित्य नव्हते. ते आणले, सतत सात महिने कांम सुरू होते. चोवीस तास मराठा, बहुजन, दलित, शिवप्रेमी तरुणांचा खडा पहारा होता. इंग्रज व पोलिसांचे पूर्ण सहकार्य होते. तरीही ब्राह्मणांचा त्रास सूरूच होता. त्यांनी लोहार, जोडारी यांना खूप त्रास दिला. त्याच दरम्यान पुतळा अनावरणासाठी समितीने इंग्लंडच्या राजपुत्रास पाचारण केले. त्यांनी येण्याची तयारी दर्शवली तेव्हा याच बाह्मणांनी त्यांना तार करून कळवले. कार्यक्रमास येवू नये. मोर्च काढले निवेदन दिले, दंगली घडवल्या पण इंग्रज मागे हटायला तैयार नव्हते. अनावरणाची तारीख ठरली. राजपुत्र मुंबईस उतरून पुण्यास येणार असे ठरले. भटांनी मुंबईला जाऊन त्यांना काळे झेंडे दाखवले. कार्यक्रम रद्द करावा म्हणून निवेदन दिले. पण राजपुत्राने ते फेटाळून लावले. 


तरी पुण्यातील कडवे ब्राह्मण हरले अथवा सरले नाहीत, त्यांनी प्रत्येक ब्राह्मणांच्या घरावर काळे झेंडे लावले व राजपुत्र ज्या रस्त्याने येणार आहेत, त्या रस्त्यावर काळ्या रांगोळ्या काढल्या. पुणे नगरपालिका पूर्णपणे ब्राह्मणांच्या ताब्यात होती. त्यामुळे सर्व ब्राह्मण नगरसेवक व नगर अध्यक्ष एक झाले त्यांनी स्वखर्चाने ठिकठिकांनी रांगोळ्या निषेध फलक लावले. शिवाय पुणे शहरात बंद जाहिर केला म्हणजे बाहेरून येणाऱ्या शिवप्रेमीची ताराबंळ झाली पाहिजे, पाणीपुरवठा ही दोन दिवस बंद ठेवला. हॉटेलही बंद ठेवले व हॉटेल मालकांनी कोणालाही पाणी पाजु नये असा दम भरला. इंग्रज सरकार असुनही ब्राह्मणांनी त्यांना जुमानले नाही. समारंभात शिवरायांच्या पुतळ्याखाली बॉम्बस्फोट घडवून आणण्याचे प्रयत्न झाले. पण जागरूक बहूजन मराठा शिवप्रेमींमुळे ते शक्य झाले नाही.
       
शेवटी दि,16 जून1928 रोजी छत्रपती शिवरायांचा जगातील पहिला पुतळा (भांबूडी) म्हणजे शिवाजीनगर येथे संपन्न झाला. ब्रिटनचे राजपुत्र सर लेस्ली विल्सन यांचे शुभहस्ते व महाराज जिवराज शिंदे यांचे अध्यक्षतेखाली हा समारंभ पार पडला. ग्रामिण भागातून महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश येथून हजारो शिवप्रेमी या समारंभात सहभागी झाले होते. याशिवाय देशभरातून सुमारे ५६५ प्रतिनिधी उपस्थीत होते. त्यामुळे अन्नपाण्याविना सर्वाचे हाल झाले. संस्थेने उपाय योजना केली होती पण ती अपुरी पडली. इंग्रजांच्या काळातील इ. स.१९२८ ची हि घटना आहे. मग विचार करा पेशवाईच्या काळात हे ब्राह्मण किती माजली असतील. ज्या क्रुर ब्राह्मणांनी हा प्रकार केला त्यांचेच वंशज आज शिवभक्त शिवशाहीर झालेत. हि घटना प्रत्यक्ष पाहिलेले अनेक मराठे आज जिवंत आहेत. पण खाजगीत उघडलेले तोंड ते दरबरात बंद करतात. सत्य आसे दडपले जाते. म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जो आपला इतिहास विसरतात ते स्वताचा इतिहास लिहू शकत नाहीत.….!!


Popular posts
७१ व्या गणतंत्र - प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा २६ जानेवारी २०२० प्रजासत्ताक दिन चिरायू व्होवो जय भारत ...जय महाराष्ट्र...... जयहिंद.
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
कोरोना बाधित रुग्णांसाठी ससून सर्वोपचार रुग्णालयात सुविधा-अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले 
Image
शांताराम कुंजीर म्हणजे लढवय्या,निर्भीड, संघर्षशील नेता!*          *भावपूर्ण श्रद्धांजली* :- श्रीमंत कोकाटे
Image
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image