मशरूम उत्पादन घेताना घ्यावयाची काळजी.*

*मशरूम उत्पादन घेताना घ्यावयाची काळजी.*


१) परिसर स्वच्छ ठेवावा.
२) उत्पादन बंदिस्त जागेत घ्यावे.
३) मशरूमच्या खोलीत खेळती हवा असावी.
४) काडणी वेळेत करावी.


*मशरूमचे औषधी गुणधर्म.*


१) मशरूममध्ये जास्त प्रथिने व कमी ऊर्जा आहे. त्यामुळे मधुमेहींना ते उपयुक्त आहे.
२) किडनीच्या रोगांवर उपयोगी
३) लठ्ठ व्यक्तींसाठी उत्तम आहार
४) पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी मदत करते.


मशरूमपासून लोणची, पापड, सूप पावडर, हेल्थ पावडर, कॅप्सूल्स, हेल्थ ड्रिंक्स इत्यादी उत्पादनेही बनविली जातात. या उत्पादनांनाही चांगली बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते.
विशिष्ट मोसमात आणि वर्षभर उगवणार्‍या मशरूमला देशांतर्गत व देशाबाहेर निर्यात केले जाते. आपल्या देशात जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, उत्तरांचल, महाराष्ट्र, पंजाब, गोवा आदी प्रांतांत मशरूम उगवते. इंग्लंड, अमेरिका, नेदरलँड, जर्मनी, डेन्मार्क, स्वीडन, स्वित्झरलँड व इतर काही देशांमध्ये निर्यात केली जाते.


मशरूमला भावही चांगला मिळतो. घाऊक बाजारात आपल्याकडे ताजा मशरूम ५० ते १०० ₹. प्रति किलो मिळतो.
ॠतुमानानुसार यात कमीजास्त फरक पडतो. उन्हाळ्यात हिवाळ्याच्या मानाने भाव जास्त मिळतो. वाळलेला मशरूम हा ताज्या मशरूमपेक्षा विक्रीला अधिक सोपा आहे. वाळवलेला मशरूम सीलबंद ठेवल्यास कमीत कमी तीन वर्षे टिकतो. त्याला प्रतिकिलो अडीचशे ते तीनशे रुपये दर मिळतो. आपल्या देशातच दिल्ली, मुंबई, श्रीनगर, चेन्नई, चंदीगढ आदी विविध शहरांमध्ये मशरूमला मोठी मागणी आहे.


आपल्या देशात गरजेच्या तुलनेत मशरूमचे उत्पादन अत्यल्प होते. लोकांमध्ये आजाराविषयी जागरूकता वाढली आहे. त्यामुळे आजाराला दूर ठेवणारे पदार्थ खाण्याकडे त्यांचा कल वाढतो आहे. त्यामुळे या क्षेत्रात नव्याने उतरणार्‍यांसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. केंद्र शासनाकडून तीस लाखांचे अनुदानही मिळते. व्यावसायिक शेती करू इच्छिणारे अथवा पारंपरिक शेती करणारे शेतकरीही या संधीचा फायदा घेऊ शकतात.