अभिनयमाला' कार्यक्रमात रसिक मंत्रमुग्ध* ................................ *अभिनय ही नाटयशास्त्राची ताकद  - डॉ. स्वाती दैठणकर*

प्रेस नोट


*'अभिनयमाला' कार्यक्रमात रसिक मंत्रमुग्ध*
................................
*अभिनय ही नाटयशास्त्राची ताकद  - डॉ. स्वाती दैठणकर*पुणे:


'अभिनय हा नाटयशास्त्राच्या  मूळतत्वाची ताकद आहे, कवितेचे दृश्यांतर म्हणजे अभिनय होय,' अभिनयमाला 'हा कार्यक्रम रंगमंदीराकडून ध्यानमंदीराकडे घेऊन गेला, अंतर्मुख करायला लावणारा असा अभिनय पाहायला मिळाला', असे उद्गार नृत्यगुरु डॉ. स्वाती दैठणकर यांनी काढले.


 निमित्त होते भारतीय विद्या भवन','इन्फोसिस फाऊंडेशन'च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत 'अभिनय माला ' कार्यक्रमाचे.
रविवार, ५ जानेवारी २०२० रोजी सकाळी १० वाजता 'भारतीय विद्या भवन'चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम झाला.त्याला रसिक प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.


 या  कार्यक्रमात ६ नृत्यांगनांनी  शास्त्रीय नृत्याच्या माध्यमातून पारंपरिक आणि समकालीन विषयांवर आधारित नृत्य संरचना  सादर केल्या. 


 नेहा भाटे यांनी भरतनाट्यम् मधून ' यशोदा आणि कृष्ण यांच्यातील संवाद ' रंगवला, मुग्धा तिवारी यांनी कथक मधून ' शुर्पणखा- एक व्यक्तिमत्व ' सादर केले. रसिका गुमास्ते यांनी ' दी लॉरेलाय - एक मोहक स्त्री ' ही जर्मन कविता सादर केली.  यामध्ये त्यांनी प्रत्येक सुंदर गोष्ट ही चांगली असतेच असे नाही असे आपल्या नृत्यातून सादर केले. नेहा मुथियान आणि जान्हवी पाठक यांनी कवी आरती प्रभू यांची ' गाडा '  ही कविता कथक आणि कंटेंपररी मधून रसिकांसमोर सादर केली. कोहिनूर दर्डा यांनी ऑटिझम असलेल्या मुलाचा आणि आईचा संवाद नृत्यातून आणि अभिनयातून सादर केला. श्रुती पत्की यांनी ' परंपरा आणि नवता ' यांचा संगम करून 'अनामिका ' ही नायिका प्रस्तुत केली.


 'भारतीय विद्या भवन'चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले. स्वरदा देखणे यांनी 'स्वरदा परफॉर्मिंग आर्टस् अँण्ड रिसर्च सेंटर ' ची माहिती दिली. देवयानी फडणीस यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी मान्यवरांनी सर्व कलाकारांचा सत्कार केला.           


     ललित कला केंद्राचे डॉ. सुभाषचंद्र भेलके म्हणाले,' एखादे सूत्र रसिकांसमोर घेऊन जाणं आणि प्रस्तुत करणे म्हणजे अभिनय होय . आपल्या इंद्रियांचा वापर करून सूक्ष्म आणि गंभीर भाव पोहचवणे म्हणजेच अभिनय' .
             
 हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य होता. 'भारतीय विद्या भवन' आणि 'इन्फोसिस फाऊंडेशन'च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा ९७ वा कार्यक्रम होता


...............................................