प्रेस नोट
*डॉ पतंगराव कदम राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत अस्मिता सावंत,अलका पांड्ये विजयी*
पुणे :
भारती विद्यापीठ 'इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट '(आयएमईडी') आयोजित डॉ. पतंगराव कदम राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत अस्मिता सावंत(पीसीपी कॉलेज,पुणे ),अलका पांड्ये(आय एम ई डी ) प्रथम क्रमांकाने विजयी झाल्या. ९ जानेवारी रोजी ही वक्तृत्व स्पर्धा आय एम ई डी च्या पौड रस्तायेथील कॅम्पस मध्ये पार पडली .सुरेश पाटील(कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणे ),शुभम जोशी(यशवंतराव चव्हाण लॉ कॉलेज ) यांना द्वितीय क्रमांक तर यशवंत खाडे(स.प. महाविद्यालय ) ,प्रियांका माने(सिद्धिविनायक महिला महाविद्यालय) यांना तृतीय क्रमांक मिळाला. 'आयएमईडी' चे संचालकडॉ. सचिन वेर्णेकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. मराठी आणि इंग्रजी भाषांमध्ये ही स्पर्धा झाली.मराठी ,इंग्रजी गटातील विजेत्यांना रोख दहा हजार,सात हजार,पाच हजार अशी पारितोषिके अनुक्रमे प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांकांना देण्यात आली.
-------------------------------------------------